Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देण्यात आला. (Femina Miss India Winner name age)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण ? 
रविवारी जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये सिनीनं जेतेपद पटकावलं. तर, राजस्थानच्या रुबल शेखावत हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. स्पर्धेत तिसरं स्थान उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला मिळालं. 


कोण आहे सिनी शेट्टी ? 
21 वर्षीय सिनी शेट्टी हिचा जन्म मुंबईत झाला. पण, ती मुळची कर्नाटकची आहे. अकाऊंटिंग आणि फायनान्स या क्षेत्रातून तिनं पदवी शिक्षण घेतलं. शिवाय तिनं सीएफए (चार्टर्ड फाइनान्शियल अॅनालिस्ट) म्हणूनही काम केलं. 


सिनी अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करण्यासोबतच कला जगतातही पारंगत होत आहे. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तिका आहे. वयाच्या अवघ्या 4 थ्या वर्षापासून तिनं भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sini Shetty (@sinishettyy)


सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये परीक्षक म्हणून नेहा धुपिया, मलायका अरोरा, डिनो मोरिया, क्रिकेटपटू मिताली राज, डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना, कोरिओग्राफर शामक दावर यांची हजेरी पाहायला मिळाली.