मुंबई : अभिनेता फिरोज खान आपली वेगळी शैली, अनोखा अंदाज आणि त्यांच्या भूमिकांमुळे ओळखले जातात. फिरोज खान एक असे अभिनेता आहेत ज्यांचा अभिनय खूप आधुनिक आणि पुढच्या काळाता ओळखला जात आहे. फिरोज खान यांचा स्टायलिश आणि शाही अंदाज प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता निर्माण करायचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मात्मा, जाबाज, कुर्बानी, दयावान सारख्या सिनेमांनी त्यांनी प्रगतीपथावर ठेवलं. प्रोफेशनल आयुष्याबरोबरच फिरोज खान आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. 1939 मध्ये 25 सप्टेंबर रोजी फिरोज खान यांचा पठान वडिल आणि ईरानी आईच्या घरी जन्म झाला. फिरोज खान यांचं एप्रिल 2009 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले, तेव्हा ते 70 वर्षांचे होते. 


फिरोज खान यांनी सुंदरी यांच्यासोबत 1965 साली आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. 1985 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. फिरोज यांच अनेक अफेअर असल्याची चर्चा होती, पण एक अफेअर असं होतं जे खूप चर्चेत राहिलं. हे अफेअर होतं एअर होस्टेस ज्योतिका धनराजगीरसोबत. ज्योतिका ही राजा  महेंद्रगिर धनराजगीर यांची मुलगी.


ज्योतिकाला पाहताच फिरोज खान आपलं हृदक तिला देऊन बसले होते. फिरोज खान यांच अगोदरच लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांची पत्नी सुंदरीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फिरोज खान यांनी देखील कोणताच विचार न करता ज्योतिकाकरता आपला सुखी संसार मोडला. आणि ते दोघे लिव-इनमध्ये राहू लागले. 


एका दशकापर्यंत हे अफेअर राहिलं. कारण ज्योतिका जेव्हापण फिरोज खान यांच्याशी लग्नाबद्दल बोलायची तेव्हा ते टाळायचे. नंतर ज्योतिकाला वाटू लागलं की, फिरोज खान त्यांच्याशी लग्न करणार नाही आणि तिने आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर फिरोज खान यांनी देखील एका मुलाखतीत आपण ज्योतिकाला ओळखत नसल्याचं सांगितलं. 


यानंतर ज्योतिकाला देखीलम मोठा धक्का बसला आणि ती परदेशी निघून गेली. यानंतर फिरोज खान पुन्हा आपली पत्नी सुंदरी आणि मुलांकडे निघून गेले. पण पत्नी सुंदराने त्यांना कधीच मनापासून स्विकारलं नाही. आज फिरोज खान आपल्यात नाहीत पण त्यांचा मुलगा फरदीन खान आणि मुलगी लैला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. पाच दशक आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या फिरोज खान यांनी 2007 मध्ये 'वेल्कम' या सिनेमांत शेवटचं काम केलं.