मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या नवीन पुस्तकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. धार्मिक भावना दुखावल्यामुळे करीनाविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनाने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र बायबलचे नाव 'प्रेग्नसी बायबल' या पुस्तकावर वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय बुधवारी ईसासई धर्माच्या लोकांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशीष शिंदे यांनी करीनाविरोधात शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे. करीना सध्या तिच्या  'प्रेग्नसी बायबल' पुस्तकामुळे चर्चेत आहे. 



तक्रारीबद्दल करीनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. पण  या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून निर्णय घ्यावा अशी मागणी ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे. करीनाने 9 जुलै रोजी आपले पुस्तक प्रकाशित केले. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या मुलाल जन्म दिल्यानंतर करीनाने पुस्ताकाला तिचं तिसरं बाळ असल्याचं सांगितलं. 


सोशल मीडियावर करीनाने पुस्तकाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. या पुस्तकात करीनाने दोन्ही गर्भधारणेदरम्यान जाणवलेल्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांचा खुलासा केला आहे.