मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank Of India)तसेच सोशल मीडियावरुन (Social Media) आपलं बँक खातं, ओटीपी (Otp) यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कुणासोबतही शेअर करु नका, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र यानंतरी अनेकांची ऑनलाईन फसवणूक होतेच. ओटीपी शेअर केल्याने आपल्या खात्यात असलेल्या रक्कमेला मुकावं लागतं आणि आर्थिक नुकसान होतं. अशीच फसवणूक बॉलिवूड अभिनेत्यासोबत झाली आहे. अभिनेत्याला तब्बल 4 लाख 36 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घालण्यात आला आहे. (film actor annu kapoor cheated of ruppes 4 lakh 36 thousand in online fraud)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नु कपूर (Annu Kapoor) यांना 4 लाख 36 हजारांचा ऑनलाईन गंडा (online fraud) घालण्यात आला. तुमच्या बँकेचे केवायसी डिटेल्स अपडेट करायचंय, तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आला असेल तो सांगा, असा कपूर यांना फोन आला. कपूर यांनी ओटीपी शेअर करताच त्यांच्या खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात गेले. कपूर यांना आपली फसगत झाल्याचं लक्षा आल. त्यांनी तातडीने ओशिवारा पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने कपूर यांना 3 लाख 8 हजार रुपये परत मिळणार आहेत.


रक्कम 2 खात्यात ट्रासन्सफर


"कपूर यांच्या खात्यातून फसवणूक करून काढण्यात आलेली 4 लाख 36 हजार ही रक्कम 2 खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. मात्र बँकेकडून कपूर यांना तुमच्या खात्यासोबत काही तरी छेडछाड करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं", अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कपूर यांनी क्षणाचा विलंब न लावता पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. तसेच ज्या बँकेत रक्कम ट्रान्सफर करण्यात आली त्यांच्याशी संपर्क केला.


"ही दोन्ही खाती या बँकांनी गोठवली आहेत. त्यामुळे कपूर यांना ३.०८ लाख रुपये परत मिळणार आहेत. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत", अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.