मुंबई : जून्या गाण्यांना नव्या संगीताचा मुलामा चढवून रिमेक करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे. मात्र ही नव्याने समोर आलेली जूनी गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत. त्याचबरोबर पंजाबी गाण्यांचा रिमेक करण्यावरही भर दिला जात आहे. काला चश्मा, दिल चोरी साड्डा हो गया, सेटरडे सेटरर्ड यानंतर बागी २ मधील अजून एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. मुंडिया तो बच के चे रिमेक या सिनेमात ऐकायला मिळणार आहे.


टायगरचे ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर श्रॉफने ट्विट करून गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली. ट्विट करताना त्याने म्हटले की, हे गाणे बागी २ मधून मुंडिया तो बच के... मला आशा आहे की, हे गाणे लोकांच्या पसंतीस पडेल.या गाण्यात टायगर आणि दिशाचा भांगडा पाहायला मिळणार आहे. ज्यात टायगरच्या जबरदस्त डान्स मुव्जची मेजवानी आहे. तर दिशाच्या अदा प्रेक्षकांना भूरळ पाडतील. चन्नी सिंग हे या गाण्याचे गीतकार आहेत.



सिनेमात हेही कलाकार


बागी २ च्या निर्मात्यांनी बागी २ चा ट्रेलर मुंबईच्या रेसकोर्समध्ये अनोख्या अंदाजात प्रदर्शित केला. मुंबईच्या रेसकोर्सवर टायगर-दिशाची जोडी हेलीकॉप्टरमधून उतरली. सिनेमात प्रतीक बब्बर, मनोज बाजपेयी, रणदीप हुड्डा, दर्शन कुमार आणि दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार देखील आहेत. बागी २ हा सिनेमा ३० मार्चला प्रदर्शित होईल.