टीझर : मोहिनी बनून `एक दोन तीन`वर थिरकली जॅकलीन
८० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा `तेजाब`चे पॉप्युलर सॉंग `एक दो तीन` च्या नव्या वर्जनमध्ये जॅकलीन मोहिनी बनून थिरकणार आहे.
मुंबई : ८० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'तेजाब'चे पॉप्युलर सॉंग 'एक दो तीन' च्या नव्या वर्जनमध्ये जॅकलीन मोहिनी बनून थिरकणार आहे.
'बागी २' मध्ये ती 'एक दो तीन' चं नव वर्जन आणतयं. मेकर्स आणि स्टारकास्टने इंस्टाग्रामवर सॉंग चा टीझर टाकण्यात आलायं.
गाण्याची उत्सुकता
जॅकलीन या गाण्यात खूप ग्लॅमरस दिसतेय. टीझरमध्ये जॅकलीनची एक झलक पाहूनच तिच्या चाहत्यांना संपूर्ण गाण्याची उत्सुकता लागून राहिली.
माधुरीला १६ दिवस
मीडिया रिपोर्ट्सनुसार माधुरी दीक्षितने या गाण्याच्या प्रॅक्टीससाठी १६ दिवस प्रॅक्टीस केली आणि ७ दिवसात या गाण्याच शूट संपवल होतं. सरोज खान या गाण्याची कोरियोग्राफी केली असून तिला यासाठी पुरस्कारही मिळाला होता.
आता गाण्याचा टीझर आणि पोस्टर आलाय आणि जॅकलीनची माधुरीसोबत तुलना होऊ लागली आहे.