चित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक
कोरोना व्हायरसने सर्वांचं जीवन कठीण केलं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने सर्वांचं जीवन कठीण केलं आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे रोज हजारो लाोकांचे प्राण कोरोनामुळे जात आहेत. काही रूगणांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनामुळे अनेक दिग्गज लोकांनी जगाचा निरोप घेतला. अशा सर्व परिस्थितीत धक्कादायक बाब म्हणजे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंद व्हेंटिलेटर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. आयसीयूमध्ये ठेवल्यानंतरही त्याच्या फुफ्फुसातील संसर्ग वाढला होता.
त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. राजीव मसंद यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी पत्रकारिता सोडून दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. धर्मा प्रॉडक्शन कंपनीमध्ये ते सीओओ या पदावर कार्यरत आहेत. उभरत्या कलाकारांना संधी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
नुकताचं डीसीए अनेक नव्या कलाकारांना लाँच करण्याचा प्रोजेक्ट सुरू होता. ज्यामध्ये तृप्ती डिमरी पासून अन्य कलाकार देखील सामील आहेत. ज्यांना बॉलिवूडमध्ये रोल देण्याचं जाहिर करण्यात आलं. राजीव मसंद 42 वर्षांचे आहेत, आणि फार कमी वयात त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. त्यांच्या महेनतीच्या जोरावर त्यांना संपदक देखील करण्यात आलं.
त्यांनी 'मसंद की पंसद' असा शो देखील लाँच केला. ज्यामध्ये त्यांनी समीक्षकाची भूमिका योग्य प्रकारे पार पाडली. जगात त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय त्यांची ओळख जगातील नं.1 समीक्षक म्हणून देखील आहे. कोरोनामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सेलिब्रिटी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.