मुंबई : महेश भट्टच्या कलियुग सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केलेली अभिनेत्री स्मायली सूरी. २००५ मध्ये आलेल्या कलियुग सिनेमानंतर ती सिनेमातून अगदी गायबच झाली. याचे कारण आता उघड झाले आहे. डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा खुद्द स्मायलीने केला आहे. आयएएनएसनुसार, स्मायलीने सांगितले की, कलियुग सारख्या हिट सिनेमानंतरही माझे करिअर घडू शकले नाही. आणि यातच माझ्या कुटुंबातील सर्वांचे करिअर यशस्वी आहे. त्यामुळे माझे करिअर घडू न शकल्यामुळे आलेले नैराश्य आणि त्यात कोणाकडे मदत मागणे माझ्यासाठी कठीण होऊ बसले.


यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच तिला पोल डान्सबद्दल कळले. त्यामुळे तिला आधार मिळाला. माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. ३४ वर्षीय स्मायली म्हणते की, मला माझ्या आयुष्याचे उद्दीष्ट्य शोधण्यास थोडा वेळ लागला. आलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास वेळ गेला. जसा प्रत्येकाला लागतो. पुढे ती म्हणाली की, पोल डान्सने मला एक स्थिर मानसिकता देण्यास मदत केली. त्याचबरोबर ट्रेनिंगनंतर मी इतकी दमायचे की मग खूप शांत झोप लागायची. सिल्क आणि पोल डान्सिंग शरीरासाठी एक प्रकारच्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही आणि यामुळेच डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत झाली.



आता या सिनेमांमध्ये झळकेल स्मायली


कलियुगमध्ये स्मायली सुरी ये मेरा इंडिया मध्ये झळकेल. त्याचबरोबर ती क्रुक आण तिसरी ऑख: द हिडन कॅमेरा या सिनेमातही दिसेल. तिने टी.व्ही. मालिका जोधा अकबरमध्येही रुकईयाची भूमिका निभावली होती. स्मायली ही कलियुगचे दिग्दर्शक मोहित सुरीची बहिण आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट, पूजा भट्ट, इमरान हाश्मी आणि स्मायली ही भावंडे(कझिन्स) आहेत.