मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. क्रिडापटूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांचा जीवनप्रवास बायोपिकमधून दाखवला जात आहे. त्यातच आता बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसारामवर लवकरच बायोपिक  बनवण्यात येणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सुनील बोहरा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सुनील बोहरा पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहिलेल्या 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’या पुस्तकावर सुनील बोहरा चित्रपट बनवण्यात येणार आहे. एवढंच नाही तर सुनील बोहराने हा चित्रपट बनवण्यासाठी चित्रपटाच्या राइट्सचीही खरेदी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गॅंग्स ऑफ वासेपुर', 'तनु वेड्स मनु', 'शाहिद' आणि 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. आता त्यांनी आसारामवर चित्रपट बनवण्याचं निश्चित केलं आहे. उशीनर मजूमदार यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आसारामच्या आयुष्याबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. 



सुनिल बोहराने एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत, मी आसारामवर लिहिलेलं पुस्तक वाचलं. पीसी सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेता लढवला होता आणि खटला जिंकत त्या मुलीला न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या कृत्याने मला प्रभावित केलं असल्याचं सुनिल बोहराने सांगितलं. या खटल्याशी संबंधीत जोधपूर आणि सूरत कारागृहातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही या बायोपिकसाठी मला प्रेरित केल्याचं त्यांनी सांगितलं. माझा चित्रपट या खऱ्या आयुष्यातील हिरोवर आधारित असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


सुनिल बोहरा लवकरच या चित्रपटासाठी आपल्या टीमसोबत स्क्रिप्टचं काम सुरु करणार आहेत. त्यानंतर चित्रपटासाठी कलाकारांवर काम करण्यात येणार आहे. सुनिल यांचा हा चित्रपट आंतराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा मानस आहे.