जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये एक अजनबी, शूट आऊट एट लोखंडवाला आणि जंजीर या सिनेमांचा समावेश आहे. अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर अर्थातच हसिना पारकरवर आधारित 'हसिना पारकर हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावायला सज्ज झालाय. कसा आहे हसिना पारकर? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी?


सिनेमाचं कथानक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हसिना पारकर या सिनेमाची गो़ष्ट सुरु होते एका कोर्ट रुम ड्रामापासून... या कोर्ट रुममध्ये हसिना पारकर वकिलाच्या प्रश्नांची उत्तरं देत असते, कधी भाऊ दाऊद इब्राहिमवर तिला प्रश्न विचारले जातात, तर कधी तिच्या पतीविषयी चौकशी केली जाते. या सिनेमात हसिना पारकरचा प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी केलाय...


सिनेमाची कहाणी जशी जशी सरकत जाते... तसतसं सिनेमात हिंदू मुस्लिम दंगली, बाबरी मस्जिद, मुंबई बॉम्ब ब्लास्ट अशा अनेक घटनांचा संदर्भ येत जातो. हे सगळे एलिमेट्स असतानाही अभिनेत्री श्रद्धा कपूरनं साकारलेली हसिना तुम्हाला इंप्रेस करण्यात यशस्वी ठरत नाही. श्रद्धा तिच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यात फेल ठरते. याच बरोबर तिच्या भावानं अर्थातच सिद्धांत कपूरनं साकारलेला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमही हवा तितका दमदार वाटत नाही. सिनेमाच्या कहाणीपेक्षाही कमजोर आहे हसिना पारकर या सिनेमाचा स्क्रीनप्ले, ज्यामुळे एकापोइंटनंतर सिनेमा बोरींग होत जातो.


चित्रपटाचं संगीत


संगीतकार अमर मोहिले यांचा बैकग्राउंड स्कोर खूपच दमदार झालाय. सिनेमाच्या थीमला तो एकदम अॅप्ट बसतो. हसिना पारकर या सिनेमाच्या उत्तार्धापेक्षा सिनेमाचा पूर्वार्ध बरा झालाय. सिनेमातील गाणीही काही खास वाटत नाही. विशेषकरुन सिनेमातील कोर्ट रुम ड्रामा हा गंभीर स्वरुपाचा न वाटता, हास्यास्पद वाटतो. खरं तर दिग्दर्शकानं यावर आणखी मेहनत घ्यायला हवी होती.


हसिना पारकर या सिनेमाचा बजेट ३० ते ३५ कोटींच्या आसपास आहे, पहिल्या दोन आठवड्यात सिनेमा जर चांगली कमाई करु शकला तर प्रोड्युसरचं भाग्यच म्हणावं लागेल. तेव्हा तुम्ही जर श्रद्धा कपूरचे मोठे फॅन आहात तर एकदा जाऊन सिनेमा पहायला हरकत नाही. सिनेमातील हे सगळे फेक्टर्स पाहता आमी हसिना पारकर या सिनेमला देतेय २ स्टार्स...