कलाकार : सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, मानव विज, दीपक डोबरियाल, झोया हुसैन
दिग्दर्शक : नवदिप सिंग
कालावधी : २ तास, ३५ मिनिटे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक बार शिकार से चिपक जाओ तो उसे छोडते नही...' हातात आलेला शिकार कधीही न सोडणाऱ्या सैफच्या 'लाल कप्तान'च्या चर्चा ट्रेलर प्रदर्शनानंतर चांगल्याच रंगल्या होत्या. एका नागा साधूच्या रुपात झळकणाऱ्या सैफला पाहाण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली होती. चित्रपट प्रदर्शनानंतर सैफच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी चित्रपटाची कथा फारच रटाळ आहे. जीवन मरणातील अंतर गाठण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक नवदीप सिंग यांनी फार काळ लावल्याचे दिसत आहे.  


'आदमी कै पैदा होते ही, काल अपने भैसे पे चल पढता है.... उसे बापिस लिबाने...' पृथ्वीवर आलोय याचा अर्थ एक दिवस रेड्यावर बसून या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. परंतु या कथेचा काळ काही येताना दिसतच नाही. चित्रपटाचा काळ कोठेतरी थांबला आहे असं वाटतं आहे. सैफने चित्रपटात वेगळ्या थाटणीची भूमिका साकारली असली तरी चित्रपटाची कथा फारच रटाळ असल्याचं समोर येत आहे. 


काय आहे चित्रपटाची कथा?  
चित्रपटाची कथा १७६४ साली झालेल्या बक्सरच्या युद्धावर आधारलेली आहे. जेव्हा ब्रिटिश सरकार भारत देशात अपलं सरकार प्रस्तपित करू पाहत होतं. मराठे, रूहेलखंडी, नवाब सर्व एकमेकांसोबत युद्ध करत होते. सर्वत्र फक्त आणि फक्त युद्ध. त्यानंतर एन्ट्री होते नागा साधूची 'सैफ अली खान', त्याच्या जीवनाचं लक्ष्य असतं ते म्हणजे गद्दार, संधीसाधू शासक रहमत खान (मानव विज)ला शोधून काढणं. 


चित्रपटाच्या फ्लॅशबॅक वरून असं कळतं की, रहमत खानने एका मुलाला आणि त्याच्या वडिलांना फाशीची शिक्षा दिली होती. परंतु हा अंदाज लावणं फार कठीण आहे की, तो मुलगा म्हणजेच सैफ आहे का? कारण जर रहमतने त्याला फाशी दिली होती तर तो पुन्हा जिवंत कसा झाला? फार गुंतागुंतीची असलेली 'लाल कप्तान' चित्रपटाची कथा गोंधळात टाकणारी आहे.