‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’: शक्तिशाली भारताची नवी कहाणी
हा चित्रपट मनोरंजनाच्या दृष्टीने पैसा वसूल असा असून, भारत हा जगाच्या तुलनेत न्यक्लिअर पॉवर कसा बनला या प्रवासाची रंजक कहाणी या चित्रपटात सांगितली आहे.
नवी दिल्ली: अभिनेता जॉन अब्राहम निर्माता असलेला 'परमाणू: द स्टोरी ऑफ पोखरण' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शीत झाला. 'परमाणू' हा चित्रपट त्या नायकांवर आधारीत आहे, जे शक्यतो प्रसिद्धी आणि झगमगाटी दुनियेपासून दूरच असतात. हे नायक आहेत अभियंते, वैज्ञानिक आणि सैनिक जे न्यक्लियर पॉवरसाठी काम करून देशाला शक्तिशाली बनविण्यासाठी कार्यकरत असतात. हा चित्रपट मनोरंजनाच्या दृष्टीने पैसा वसूल असा असून, भारत हा जगाच्या तुलनेत न्यक्लिअर पॉवर कसा बनला या प्रवासाची रंजक कहाणी या चित्रपटात सांगितली आहे.
कदाचित आजवर आपण अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले असतील. पण, 'परमाणू'सारखी कहाणी असलेला चित्रपट अशा ऐतिहासीक चित्रपटांपासून वेगळा ठरतो. हा चित्रपट एका अशा विषयांवर आधारलेला आहे ज्याने भारताला जगात एक शक्तिशाली देश म्हणून पुढे आणले. देशप्रेमाणे ओतप्रोत भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करतो. १९९८ मध्ये केलेल्या अण्वस्त्र चाचणीच्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. सखोल अभ्यास केल्यावरच हा चित्रपट बनविण्यात आला आहे.
स्टार कास्ट : जॉन अब्राहम, डायना पेंटी, बोमन ईरानी
दिग्दर्शक : अभिषेक शर्मा
निर्माता : जॉन अब्राहम