सिनेमा : ट्युबलाईट


लेखक - दिग्दर्शक : कबीर खान


प्रोड्युसर : सलमान खान


कलाकार : सलमान खान, सोहेल खान, झू झू


संगीत : प्रीतम 


वेळ : १३६ मिनिटे 


जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : आजपासून निदान दोन आठवडे तरी बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला ऐकायला मिळेल तो सिनेमा म्हणजे सलमान खान स्टारर 'ट्यूबलाईट'... आज हा सिनेमा प्रदर्शित झालाय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानचा सिनेमा चांगला असो किंवा वाईट, त्याच्या चाहत्यांची संख्या पाहता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नक्की वर्कआउट होईल यात शंका नाही. सलमान खानच्या सिनेमाचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे 'मैं दिल मे आता हूँ, समझ मे नही'... जे त्याच्या बहुतेक सिनेमांना लागूही होतं. पण या सिनेमाचं भवितव्य काय? कसा आहे ट्युबलाईट? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार? सलमानची ही ट्युबलाईट बॉक्स ऑफिसवर पेटणार का?


सिनेमाचं कथानक...


दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान या जोडीनं या आधी 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' यांसारखे हिट सिनेमे दिलेत. कबीर खान दिग्दर्शित 'ट्यूबलाईट' हा चित्रपट, हॉलिवूड सिनेमा 'लिटील बॉय'चा हा रिमेक आहे. 'ट्यूबलाईट' ही गोष्ट आहे दोन भावांची... लक्ष्मण आणि भरत.. लक्ष्मण ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता सलमान खाननं... सिनेमात भरतचा अर्थातच सोहेल खानचा मोठा भाऊ आहे. लहानपणीच आई बाबा गेल्यामुळे दोघांचं नातं घट्ट झालंय, दोघंही एकमेकांचे आधार झालेत. एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत... त्यात लक्ष्मण हा डोक्यानं जरा स्लो असल्यामुळे तो पूर्णपणे, छोट्या भाऊ भरतवर अवलंबून असतो... आणि म्हणूनच त्याला बाजूची मुलं ट्युबलाईट म्हणून हाक मारतात. 


कहाणीत मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा भरत आर्मी जॉईन करतो... इंडो चायना युद्धामुळे त्याला लक्ष्मणला सोडून जावं लागतं ज्यामुळे लक्ष्मण एकटा पडतो.. याच दरम्यान बन्ने खान म्हणजेच ओमपुरी लक्ष्मणचा सांभाळ करतात. एकीकडे इंडो चायना वॉरमध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद होतात. भरतला परत आण्यसाठी लक्ष्मणचे प्रयत्न सुरु होतात... आणि इथूनच लक्ष्मणचा एक वेगळा प्रवासही सुरु होतो. 


सलमान खान या नटाला आपण नेहमीच 'माचो' रोलमध्ये पाहिलंय. अॅक्शन पॅक्ड भूमिका, टिपिकल हिरो अंदाज, सलमानचे यालते कुठलेच एलिमेन्ट्स ट्यूबलाईटमध्ये तुम्हाला पहायला मिळणार नाही.. या सिनेमातली त्याची भूमिका खूपच हटके आहे. सिनेमा पाहताना सलमानचे फॅन्स नक्कीच त्यांचा नेहमीचा सलमान शोधण्याचा प्रयत्न करतील, मात्र शेवटपर्यंत त्यांच्या हाती निराशाच लागेल.



 


हरवलेलं कथानक...


दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाईट या सिनेमात स्टोरी मिसिंग वाटते... सिनेमाची पटकथाही भरकटलीय. ज्यामुळे सिनेमाची पकड कमजोर वाटते. कथा आणि पटकथाच ज्या सिनेमाची दमदार नसेल, तो सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही सहज लावू शकता. सिनेमामध्ये इमोशनल एलिमेन्ट्स भरपूर आहे, मात्र ते हृद्याला भिडतच नाही, यात खरं फेल्यूर आहे सिनेमाच्या दिग्दर्शकांचं...


अभिनयाचं सांगायचं झालं तर...


अभिनेता सलमान खानचा अभिनय ठिकठाक झालाय. यावेळी त्याच्या अभिनयासोबतच त्याचा हा नवा प्रयोगही फसलाय. अभिनेता सोहेल खान, चायनिज कलाकार झू झू आणि मतिन रेचा अभिनय छान झालाय. सिनेमा पाहताना या चायनीज कलाकारांचं हिंदी ऐकून हसावं की यांचं कौतुक करावं हेच कळत नाही... ट्यूबलाईट या सिनेमात खऱ्या अर्थानं ज्यांचा अभिनय कमाल झालाय ते म्हणजे ओम पुरी...


सिनेमातली गाणी...


'ट्यूबलाईट' या सिनेमाचं संगीत ठिकठाक आहे. सलमान खानच्या प्रत्येक सिनेमातलं संगीत सुपरहिट असतं. मात्र या सिनेमात तसं काही दिसत नाही. कारण ट्यूबलाईटची गाणी ठिकठाक आहे. रेडियो हे गाणं चार्टबस्टर ठकतंय...


शेवटी काय तर...


तेव्हा सलमानच्या नेहमीच्या सिनेमातला मसाला, अॅक्शन, धमाल असं काहीही ट्यूबलाईटमध्ये पहायला मिळणार नाही. तेव्हा जास्त  अपेक्षा ठेऊन सिनेमा पहायला जाऊ नका, नाहीतर केवळ निराशाच हाती लागणार... ट्यूबलाईट या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय 2 स्टार्स...