मुंबई : अजय - अतुल ही संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी. या जोडीने महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राचं संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. सातासुमद्रापलीकडे महाराष्ट्राचं संगीत या जोडीने नेलं आणि एक नवा विक्रम रचला. अजय - अतुल यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक वाद्याला आपल्या संगीतात स्थान दिलं. 'फँड्री'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील हलगी हे वाद्या घराघरात पोहोचल. आणि लोकांनी जब्याला हलगी वाजवताना पाहिलं आणि त्याच्यावर ठेका धरला. हीच हलगी आता पुन्हा एकदा अजय - अतुलच्या समोर वाजतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दोन तरूण हलगी आणि इतर वाद्य अजय गोगावले यांच्या समोर वाजवताना दिसत आहेत. हलगी हे पारंपारिक वाद्य असल्यामुळे त्याची एक वेगळीच मजा आहे. या वाद्याने अजयला मंत्रमुग्ध केलंय हे आपण पाहतोच. व्हिडिओच्या अखेरीस आपण पाहू शकतो की, अजय कशा प्रकारे यांच्या हलगीवर खूष होईन प्रतिक्रिया देतोय.