मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या नव्या सिनेमाचे स्त्री चे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. पण या सिनेमाच्या पहिले गाणे अतिशय मजेदार आहे. मीका सिंगच्या आवाजातील मिलेगी मिलेगी हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्याच्या सुरुवातील पंकल त्रिपाठीही दिसत आहे. पण या गाण्याचा शेवट अतिशय मजेदार आहे. या गाण्यातील सर्व कलाकार स्त्री बनतात आणि नाचू लागतात. हे गाणे मिका सिंग आणि सचिन जिगरने गायले आहे. तसंच सचिन जिगरने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तुम्हीही पाहा हे मजेदार गाणे...



काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. सिनेमातील राजकुमार रावचा कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. ३१ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.