2024 Blockbuster movie with low budget : चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिस कलेक्शनची चर्चा सुरु असणं ही फार साधारण गोष्ट आहे. ज्यात स्वत:ची जागा बनवण्यासाठी कलाकारांपासून दिग्दर्शकांपर्यंत सगळेच मेहनत करतात. या सगळ्यात आज आपण एका अशा एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं कमी बजेटमध्ये 100 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण ज्या चित्रपटाविषयी बोलतोय तो एक मल्याळम चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव प्रेमलु आहे. हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनवण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. या चित्रपटांना फक्त केरळमध्ये नाही तर तेलुगू भाषिक राज्यांमध्ये देखील पसंती मिळाली आहे. रोमॅन्टिक-कॉमेडी चित्रपट लोकांना फार आवडतात त्यामुळेच हा चित्रपट हिट ठरला आहे. 4 कोटींमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर अखेर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना की हा चित्रपट तुम्हाला कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहायला मिळणार?


प्रेमलुच्या ओटीटी प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची डिजिटल राइट्स हे डिज्नी प्लस हॉटस्टारनं खरेदी केले आहेत. खरंतर आता पर्यंत त्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, 29 मार्च रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत ना मेकर्सनं किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म कोणी याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रेमुलचा मल्याळम आणि तेलगू व्हर्जन प्रेक्षकांना इतका आवडला आहे की आता या चित्रपटाचं तमिळ व्हर्जन प्रदर्शित करण्यात येईल. तमिळ डब्ड व्हर्जन काल म्हणजेच 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता तमिळमध्ये देखील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकणार आहेत. 


हेही वाचा : अखेर! पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात, सलमानच्या मेहुण्याचे फोटो व्हायरल


दरम्यान, चित्रपटाच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाले तर गफूर आणि ममिता बैजू हे मुख्य भूमिकेत आहेत. तर श्याम मोहन एम, मीनाक्षी रवीन्द्रन, अखिला भाग्रव, अल्ताफ सलीम, मैथ्यू थॉमस आणि संगीत प्रताप हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. चित्रपटाचं म्यूजिक फार सुंदर आहे. ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. प्रेमलुच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर 31 दिवसात 51 कोटींचं कलेक्शन केलं होतं. सैकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं 49.62 कोटींचं कलेक्शन केरळमध्ये आणि 1.43 कोटींचं कलेक्शन तेलुगू स्टेट्समध्ये केलं. तर जगभरात या चित्रपटानं एकूण 100 कोटींची कमाई केली आहे.