Filmfare Awards 2020 : तब्बल १० पुरस्कारांवर `गली बॉय`ची बाजी
विजेत्यांची संपूर्ण यादी
मुंबई : आपल्या कामाची पोचपावती कलाकारांना पुरस्काराच्या स्वरूपात मिळते. मनोरंजन विश्वातील कलाकारंचे दरवर्षी विविध पुरस्कारांनी कौतुक केले जाते. पण कलाकारांसाठी महत्त्वाचा असलेला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार २०२० (Filmfare Awards 2020) सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. नुकत्याच पार पडलेल्या '६५ वा ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसाम' सोहळ्याला अनेक कलाकारांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.
या पुरस्कार सोहळ्यात 'गली बॉय चित्रपटाने' तब्बल दहा पुरस्कार पटकावत 'गली बॉय'ने '६५व्या ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसाम'च्या शानदार सोहळ्यात बाजी मारली. त्यामुळे याक्षणी 'गली बॉय' चित्रपटाच्या टीमवर 'अपना टाईम आयेगा' असं ठामपणे बोलण्याची वेळ आली होती. तर जेष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी हे फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले.
आसामच्या गुवाहटी येथे Filmfare Awards 2020 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियम हिंदी सिनेसृष्टीतील तारे-तारकांच्या उपस्थितीने उजळून निघाले होते.
सर्वोत्कृष्ट चित्रपटः गली बॉय
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झाेया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : आर्टीकल १५ आणि सोनचिरीया
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू, (सांड की आँख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : आयुषमान खुराना, (आर्टीकल १५)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथाः अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, (आर्टिकल १५)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): अभिमन्नू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण): अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य धर, (उरी: दसर्जिकल स्ट्राइक)
सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः अरिजीत सिंह - कलंक नही, (कलंक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः शिल्पा राव - घुंगरू (वॉर)
जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी