मुंबई : 'हम तुम' आणि 'फना' सिनेमांचा दिग्दर्शक कुणाल कोहलीच्या घरी Covid-19 मुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे कुणाल कोहलीने आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. या गोष्टीमुळे कुणाल आणि त्यांच कुटूंब प्रचंड दुःखात आहे. ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणालच्या मावशीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कुणालने याबाबत आपल्या भावना ट्विटरवर शेअर केल्या आहेत. कुणालच्या मावशीचं निधन हे शिकागोमध्ये झालं आहे. ८ दिवस कोरोनाशी लढा देत असलेल्या मावशीचं निधन झालं आहे. खूप मोठं कुटूंब असूनही यावेळी आम्ही एकत्र राहू शकलो नाही. हे दुःख खूप त्रासदायक आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 



कुणालने पुढे आपल्या मावस बहिणीचं दुःख शेअर केलं आहे. कोरोनामुळे निधन झाल्यामुळे बहिणीला देखील आईकडे जाता आलं नाही. मुलीने अखेरचं आईला पाहिलं देखील नाही. कोरोना किती कठोर आहे. 



कुणालने त्याच्या आईचा बहिणींसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्यामधल घट्ट नातं हे फक्त मृत्यूच तोडू शकतो. या बहिणींनी प्रेम, कुटूंब याचं महत्व पटवून दिलं. 




कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं अखेरचं दर्शन घेणंही कठीण आहे. कोरोनावर मात करायचा असेल तर घरी राहा, स्वच्छता राखा. हा एकच उपाय आहे.