मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झालेय.


गेल्या वर्षभरापासून होते कोमामध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परेश रावल यांनी ट्विटद्वारे त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नीरज यांना हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये अॅडमिट करण्यात आले होते. ते कोमामध्ये गेले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 


फिरोज नाडियाडवाला यांनी घेतली होती जबाबदारी


एम्समधून त्यानंतर त्यांना फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी शिफ्ट कऱण्यात आले होते. फिरोज नाडियाडवालाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. फिरोजने जुहूस्थित आपल्या घरातच त्यांच्यासाठी एक रुम आयसीयू बनवली होती. मार्च २०१७पासून २४ तास नीरज यांच्यासाठी एक नर्स, वॉर्ड बॉय आणि कुक यांच्या सेवेत होता. याशिवाय फिजिओथेरपिस्ट, न्यूरो सर्जन, अँक्युपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजीशियन हे दरआठवड्याला भेट देत होते.


ऑगस्टमध्ये नीरज यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली होती. नीरज यांनी फिर हेराफेरी, खिलाडी ४२० सारखे सिनेमे दिग्दर्शित केले. त्याशिवाय ते नाटकातही व्यस्त होते. याशिवाय नीरज यांनी अनेक सिनेमांसाठी संवाद लेखनही केले. त्यांनी रंगीला, अकेले हम अकेल तुम, ताल, जोश, बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दीवाना या सारख्या सिनेमांसाठी संवाद लेखन केले. 



 


नीरज हेराफेरी ३वर काम करत होते. मात्र आजारपणामुळे हे काम होऊ शकले नाही.