अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेमात; फोटो शेअर करत दिली अखेर प्रेमाची कबुली
अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशलम मीडियावरही अभिनेत्री सतत सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रश्मिका काही ना काही शेअर करत असते. नुकतीच रश्मिकाने सकाळ सकाळी एक पोस्ट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. जी पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.
मुंबई : अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशलम मीडियावरही अभिनेत्री सतत सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रश्मिका काही ना काही शेअर करत असते. नुकतीच रश्मिकाने सकाळ सकाळी एक पोस्ट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. जी पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असतं. आता अभिनेत्रीने अशी पोस्ट शेअर केलीये ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सकाळ सकाळी रश्मिकाच्या अकाऊन्टवरुन प्रेमाची पोस्ट पाहून चाहते खूश झाले असतील यात काहीच शंका नाही. याआधी अभिनेत्रीचं नाव अभिनेता वजय देवरकोंडा याच्यासोबत अनेकदा जोडलं गेलं आहे. रश्मिका मंदान्ना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाईही केली आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
आता रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मॉर्निंग फोटो शेअर केलाय पण तिच्या आकर्षण ठरतंय ते म्हणजे फोटोमधील कॅप्शन हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने गुड मॉर्निंग माय लव्ह असं लिहीलंय. त्यामुळे तिने तिचा हा फोटो शेअर करुन निसर्गावरचं प्रेम व्यक्त केलंकी की अजून कोणासाठी लिहीलंय हे अद्याप समजलेलं नाही. मात्र तिच्या प्रेमाची ही पोस्ट मात्र सध्या चर्चचा विषय ठरतेय एवढं मात्र नक्की.
दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच विविधभाषी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं अगदी कमी वेळातच कमालीची लोकप्रियता मिळवली. नॅशनल क्रश म्हणूनही तिचा उल्लेख केला जातो. कोणासाठी ती हावभावांची राणी, तर कोणासाठी मनाची राणी.... साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना Rashmika Mandanna सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पुष्पा' चित्रपटाची 'श्रीवल्ली' बनून तिने असं स्थान निर्माण केलं आहे की, तिने हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केलं. यामुळेच तिने बॉलिवूडमध्येही धमाकेदार पदार्पण केलं.