मुंबई : क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांची लेक सारा तेंडूलकरला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा जरी सेलिब्रिटी नसली तरी ती चर्चेत मात्र कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसते. अनेकदा सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जातं. मात्र अद्यापतरी या क्षेत्रात येण्याबाबत तिने मौन बाळगलं आहे. अनेकजण तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर साराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांची सारा क्रश आहे. मात्र आता सारा तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. नुकताच सारा तेंडुलकरचा रिझल्ट लागला आहे. 'युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन' मध्ये सारा तेंडुलकर वैद्यकीय शिक्षण घेत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल' या शाळेतून शालेय शिक्षण पुर्ण करुन सारा पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. साराने लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. नुकतंच साराने तिचं मास्टर्स पुर्ण केलं आहे. साराने तिचं मास्टर्स 'कॉलेज ऑफ लंडन' मधून वैद्यकशास्त्रातून पुर्ण केलं आहे. साराने 'क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन'मधून डिग्री मिळवली आहे. ७५ टक्क्यांहून अधिक गुण साराला या कोर्समध्ये मिळाले आहेत. 2018 मध्ये लंडनमध्येच साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होतं. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 


साराची आई अंजली तेंडुलकर बालरोगतज्ञ आहे. आता आईच्या पाठोपाठ सारानेही याच क्षेत्रात करिअर करणं निवडलं आहे. तिने तिच्या आईप्रमाणेच वैद्यकीयशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. साराच्या दीक्षांत समारंभासाठी तिचे आई वडिलही उपस्थित होते. साराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. साराने वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यामुळे तिचं कुटूंबदेखील खूप असल्याचं दिसत आहे. 


सारा तेंडुलकर बाहेर पडताच ती पापाराझींच्या कॅमेरात कैद होते. सोशल मीडियावर तिचे अनेकदा लूक चर्चेत असतात. सारा गेल्या काही काळापासून शुभमनचे नाव क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र अनेकदा या दोघांच्या नात्याची चर्चा होताना दिसते. अनेकदा सराच्या लग्नाच्याही अफवा उडतात.



 काही दिवसांपुर्वी UAE चा क्रिकेटर चिराग सूरीने शुभमन आणि सारा यांच्या नात्याला पुष्टी देणारं एक मोठं वक्तव्य केलं होतं. एका पत्रकाराने चिरागला प्रश्न विचारला होता की, लग्न होणारा पुढचा खेळाडू कोण असेल? यावर उत्तर देत चिरागने लगेच शुभमन गिलचं नाव घेतलं. यानंतर रिपोर्टमध्ये त्याच्या भावी पत्नीचं नाव विचारलं. चिराग न डगमगता म्हणाला, 'सारा, सचिन तेंडुलकरची मुलगी.'