मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या ट्रोलरविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. अत्यंत अश्लील भाषेत ट्रोलरले अनुरागच्या मुलीच्या फोटोवर प्रतिक्रिया लिहिली होती. एफआरआय दाखल करण्यात आल्यानंतर अनुरागने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचे आभार मानले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा जोरदार रंगत आहे. अशात एका ट्रोलरने अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एफआरआय दाखल झाल्यानंतर त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा आभार मानले आहेत. ट्विटरवर ट्विट करत त्याने लिहिले की, 'तुमच्या सहकार्याने आणि मदतीने हे शक्य झाले आहे. आता एक पिता म्हणून मला अधिक सुरक्षित वाटत आहे.' 


अनुराग कश्यपच्या मुलीच्या फोटोवर ट्रोलरने बलात्काराची धमकी दिली होती. मोदींना टॅग करत अनुरागने त्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला होता, आणि अशा लोकांसोबत कशाप्रकारे व्यवहार करायला हवा?, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता.