मुंबई : अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चाहते फक्त भारतातच नाही तर,  साता समुद्रा पार देखील आहे. सलमानने एखादा नवीन लूक केला तर, तो चाहत्यांनी फॉलो केलाच पाहिजे. चाहते फक्त सलमानचा लूकच फॉलो करत नाही तर, त्याच्या अभिनयाला देखील डोक्यावर घेतात. पण भाईजानला फॉलो करणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध झालेला आझम अन्सारी (Azam Ansari) अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्सारीने डाळीबाग दालीगंज रेल्वे ओव्हरब्रिजवर रील  (Instgram Reel Video) बनवून ती इन्स्टाग्रामवर  पोस्ट केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. याआधीही क्लॉक टॉवरवर गर्दी जमवून रील बनवल्याप्रकरणी ठाकूरगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


आझम अन्सारी सलमान खानच्या 'तेरे नाम' (tere nam)  गाण्यावर रेल्वे ट्रॅकवर शर्टलेस होवून व्हिडिओ बनवत होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे. (Fir Against Azam Ansari)


आरपीएफ लखनऊचे ( Lucknow News) निरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध कलम 147, 145 आणि 167 रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.