सलमान आणि शिल्पाच्या अडचणीत वाढ
टी.व्ही. शोमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्याच्या आरोप असलेल्या सलमान खान आणि शिल्पाच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : टी.व्ही. शोमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्याच्या आरोप असलेल्या सलमान खान आणि शिल्पाच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान आणि शिल्पाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.यामध्ये त्यांनी जातीवाचक शब्दाचा प्रयोग केला आहे. या शब्दामूळे वाल्मिकी समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.
७ दिवसांच्या आत उत्तर
'नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट'ने माहिती आणि प्रसारण विभाग, दिल्ली आणि मुंबच्या पोलीस कमिशनरांकडे तक्रार दाखल केली. याचे ७ दिवसाच्या आत उत्तर मागितले आहे.
वाल्मीकी समाज अॅक्शन कमिटीच्या दिल्ली अध्यक्षांनी पश्चिम दिल्लीच्या डीसीपींना यासंबंधी तक्रार केली आहे. या तक्रारीची कॉपी फेसबुकवर टाकली.
घोषणाबाजी आणि पोस्टर्स जाळली
सलमान आणि शिल्पाच्या वक्तव्याने समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मंगळवारी राज्यस्थानच्या अजमेरमध्ये हा क्रोध पाहायला मिळाला.
अजमेर येथे सलमानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा पुतळा देखील जाळण्यात आला.