मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानने केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. सलमानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी जातीवाचक शब्दांचा वापर केल्याने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजाच्या कृती समितीच्या दिल्ली येथील अध्यक्षांनी उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची कॉपी फेसबुकवर व्हायरल होत आहे. सलमानसोबत शिल्पा शेट्टी देखील आहे. 


वाल्मिकी समाजातील लोक सलमान, शिल्पाच्या वक्तव्याने बरेच नाराज झाले आहेत. याचे पडसाद मंगळवारी राजस्थानमधील अजमेर भागात पाहावयास मिळाले. अजमेर येथे सलमानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा पुतळा देखील जाळण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या कार्यक्रमाचे होर्डिंग्जही जाळण्यात आले.


तक्रारकर्ते संजय गहलोत यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.  अलीकडे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने खासगी वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत चित्रपटाच्या डान्स डायरेक्टरने दिलेल्या डान्स स्टेप्सची तुलना करताना जातिवाचक शब्दाचा वापर केला. त्याच्या या जातीवाचक शब्दांनी वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वाल्मिकी समाजात प्रचंड रोष आहे, असे गहलोत यांनी सांगितले. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी अशा जातीवाचक शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. त्यांचे असे वागणे कुठल्याही स्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे गहलोत यांनी सांगितले.