`आग` सिनेमाचे प्रथम शूटिंग झालेला आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी
प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. विशेष योगायोग म्हणजे `आग` सिनेमाचे प्रथम शूटिंग झाले तोच आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
मुंबई : प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. डान्स रिएलिटी शोच्या सेटवर ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. विशेष योगायोग म्हणजे 'आग' सिनेमाचे प्रथम शूटिंग झाले तोच आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
मुंबई आर के स्टुडिओ उभारण्यात आल्यानंतर आग सिनेमाचे शूटिंग झाले. नियतीचा अजब न्याय म्हणजे आगीनेच हा स्टुडिओ जळून खाक झाला. आगीत स्टुडिओतील काही भाग जळून खाक झाला. सेटसाठी लागणारे प्लायवूड या भागात असल्याने आग झपाट्याने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले.
मोठ्या आगीमुळे चेंबूर नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. तर काहीवेळ वाहतूक रोखण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी शुटिंग नसल्याने स्टुडिओत फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आर के स्टुडिओलगतच्या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आलेय. दरम्यान, आर के स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.