संकट संपता संपेना... शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार, जीवघेणा हल्ला
शहनाज गिलचं दुःख संपता संपेना....
मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) च्या निधनानंतर मोठ्या धक्यात होती. आता कुठे शहनाज गिलचं आयुष्य थोडं नॉर्मल लाइफवर येतच होती. तेवढ्यातच तिच्या वडिलांना जीवघेणा हल्ला झाला आहे.
शहनाजचे वडिल संतोख सिंह सुख यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर शहनाज गिलच्या चाहत्यांनाही मोठा धक्का मिळाला आहे.
शहनाजच्या वडिलांवर गोळीबार
बिग बॉस फेम आणि पंजाही सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) चे वडिल संतोख सिंह सुखवर फायरिंग झालं आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी अमृतसरच्या जंडियाला गुरू परिसरात ही घटना घडली.
पोलिसांना शहनाजच्या वडिलांना दिलेल्या माहितीनुसार, कार त्यांनी रस्त्याच्या एकाबाजूला उभी केली. त्यांचे सुरक्षारक्षक गुरदासपुरियच्या ढाब्याजवळ शौचालयाला गेले. त्यांनी सांगितलं की, दोन लोक बाइकवर आले. कार जवळ येऊन थांबले. त्याचवेळी त्यांच्यावर फायरिंग झाली. शहनाजच्या वडिलांच्या कारवर चार गोळ्या झाडण्यात आल्या.
संतोख सिंह थोडक्यात वाचले
संतोख सिंह (Santokh Singh) घटनेच्या वेळी आपल्या गाडीत ड्रायव्हरसोबत होते. यावेळी ते अगदी मरता मरता वाचले. संतोख सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. शनिवारी ते एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. याकरता ते अमृतसरवरून ब्यासपर्यंत जाणार होते.
या घटनेनंतर सुरक्षारक्षकाने सांगितले की, गोळ्यांचा आवाज ऐकताच हल्लेखोरावर वीट फेकली. मात्र तो पळून गेला. त्यांनी तात्काळ जंडियाला गुरू पोलिसांना घटनेची माहिती दिली.
संतोख सिंह यांचा आरोप
पोलिसांना घटना घडताच माहिती देण्यात आली. मात्र अद्याप याबाबतचा गुन्हा अद्याप नोंदवलेला नाही. जंडियाला गुरू पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून चार रिकामे कवच जप्त केले.
"प्राथमिक तपासणीनंतर, हे प्रकरण काहीसे संशयास्पद असल्याचे आढळून आले आणि म्हणून पुढील तपास केला जात आहे," तो म्हणाला की त्याच्यावर अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल असल्याने अलीकडेच त्याची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.