Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी गोळी झाडण्याच्या प्रकरणी रोज कोणते ना कोणते खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे. काल बुधवारी 17 एप्रिल रोजी हरिणायामधून आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिस त्याची विचारपुस करत आहेत. 'पीटीआई' च्या रिपोर्टनुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की संशयित व्यक्ती हल्ल्याच्या आधी आणि त्यानंतर शूटर्सच्या संपर्कात होता. त्याशिवाय दुसरीकडे अशी देखील माहिती आली आहे की ज्या दोन शूटर्सची अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना संशय आहे की ज्या व्यक्तीला त्यांनी हरिणायातून अटक केलं आहे तो तुरुंगात असलेल्या गॅन्गस्टर लॉरेंस बिश्नोईचा लहाण भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. त्याचा सांगण्यानुसार हा सगळा प्रकार घडला. तर दुसरीकडे त्या दोन्ही शूटर्सना म्हणजेच सागर पल आणि विकीनं देखील पोलिसांना सांगितलं की अनमोल बिश्नोईनं त्यांना कामावर ठेवलं होतं. त्या दोघांना सलमाच्या घरावर दोन मॅगजीन म्हणजेच जवळपास 10 गोळ्या झाडण्यास सांगितले होते, असं केल्यानं त्यांना लोकप्रियतेसोबत चांगली रक्कमही मिळाली असती. त्यांना हे काम करण्याआधी 1 लाख आणि काम झाल्यानंतर 3 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं. तर या प्रकरणात क्राइम ब्रांच लवकरच सलमानचं जबाब घेणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सागर आणि विकीनं चौकशीमध्ये सांगितलं की सलमानला मारायचा त्यांचा हेतू नव्हता, तर त्याला घाबरण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, चौकशीसाठी आणखी 6 लोकांना बोलावण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की त्या दोन्ही आरोपींनी सलमानच्या वांद्रेतील घराशिवाय त्याच्या पनवेलमध्ये असलेल्या फार्महाउसची देखील रेकी केली होती. या सगळ्यासाठी लॉरेन्स बिश्नोई त्यांचे मार्गदर्शन करत होता. त्यानंच त्या दोघांना सलमानच्या घरावर गोळ्या झाडण्यास सांगितले होते. 


हेही वाचा : काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...


रिपोर्ट्सनुसार, अनमोलनं त्या दोघांना सांगितलं होतं की सलमानला घाबरवायचं आहे कोणालाही काही व्हायला नको. ते संपूर्ण रात्र बॅन्डस्टॅंडवर फिरत राहिले आणि पहाटे 4.15 च्या आसपास सलमानच्या घराच्या दिशेनं निघाले आणि हळू-हळू सुरु असलेल्या बाईकवरून त्यांनी चार राऊंड फायरिंग केली. चार गोळ्या अगदी सहजपणे झाडण्यात आल्या, पाचवी अडकली आणि चुकून जमिनीवप पडली. त्यानंतर ते क्राइम सीनवरून पळून गेले.