मुंबई : अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. आणि यासाठी नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर आता स्वत: अक्षय कुमारनेच इन्स्टाग्रामवर रामसेतूमधील आपला लूक शेअर केला आहे. याशिवाय आपल्या लूकबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्नही त्याने आपल्या चाहत्यांना विचारला आहे. 


अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, माझ्या आतापर्यंतच्या महत्वाच्या फिल्म्सपैकी रामसेतू आहे. त्यासाठी शूटिंगची सुरूवातही आम्ही आजपासून सुरू केली आहे. माझ्या या लूकबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ही सांगा.



रामसेतू सिनेमाक अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचासुद्धा काम करणार आहेत.