मुंबई : गेल्या वर्षापासून कलाविश्वात अनेक थोर व्यक्तींची यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. तर यंदाच्या वर्षीदेखील स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची कारकिर्द उलगडणारा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj The Pride of India) चित्रपट १४ ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी अभिषेक दुधैया सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचं  पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. चित्रपटाचा पहिला लूक पोस्ट करत त्यांनी 'मी खूप भाग्यवान असल्याचे देखील म्हटले आहे.



'भुज- प्राइड ऑफ इंडिया' चित्रपट १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित करण्यामागे एक प्रमुख उद्देश आहे. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या या अप्रतिम कामगिरीला उजाळा देण्यासाठी चित्रपट १४ ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.   


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj The Pride of India)  गुजरातच्या माधापुर येथील ३०० महिलांच्या शौर्यावर बेतलेला चित्रपट आहे. ज्यांनी १९७१ साली झालेल्या युद्धात भारताला यश मिळवून देण्यास एक महत्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटात अजय मुख्य भूमिका साकारणार असून संजय रणछोडदास 'पागी' भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 


चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, राणा दग्गुबाती, परिणीति चोप्रा आणि एम्मी विर्क मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अभिषेक दुधैया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, गिन्नू खनूजा, वजिर सिंग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.