मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळताच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदारनाथ चित्रपटात सारा कोणती भूमिका साकारणार, तिचा लूक कसा असेल याबद्दल अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान सेटवरील काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. सलवार – कुर्ता आणि नाकात नोजपीन घातलेली सारा फारच सुरेख दिसत आहे. तिच्या हातात छत्री आहे. तिचा हा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.