Sonam Kapoor च्या मुलाची पहिली झलक समोर, कुटुंबियांचे डोळे पाणावले
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) गोंडस मुलाला जन्म दिला.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) गोंडस मुलाला जन्म दिला. सोनमने मुलाला जन्म दिल्याची माहिती अभिनेत्री नितू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. सोनमचं बाळ आहे म्हटल्यानंतर चिमुकल्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल. अशात सोनम कपूरची बहिण रिया कपूरने नव्या पाहुण्याची एक झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नव्या पाहुण्याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुटुंबियांचे डोळे पाणावले आहेत.
रियाने चिमुकल्याचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'रिया मावशी ठिक नाही... क्यूटनेस प्रचंड आहे... क्षण अवास्तव आहेत.. शूर आई सोनम कपूर आणि प्रेमळ बाबा आनंद अहुजा यांना I Love You...' असं लिहिलं आहे. शिवाय रियाने सोनम, आनंद आणि सुनिता कपूरला मेंशन केलं आहे.
सध्या रियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण रियाने बाळाचा चेहरा इमोजीने झाकला आहे. सध्या रियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे बहिणीच्या बाळाला पाहून रिया भावुक झाल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
सोनम कपूरने 2018 साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केलं. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने प्रेग्नंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.