मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या 'दबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. भाईजानने रविवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सेटवरचा पहिला फोटो शेअर केला आणि तो पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटो व्हायरल होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे सिनेमातील अभिनेत्री. या सिनेमातून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून डेब्यू करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा आहे सईचा लूक 


या सिनेमातील सईचा लूक बघून तुम्हाला पहिल्यांदा सोनाक्षी सिन्हाची आठवण येईल. कारण सई अगदी सोनाक्षी सारखी दिसत होती. दबंग सिक्वलमध्ये सोनाक्षीचा जसा लूक आहे तशीच सई दिसत आहे. 


'दबंग 3' सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं असून सलमान आणि अरबाज खानने याची निर्मिती केली आहे. सलमान लवकरच एका नव्या सिनेमाची घोषणा देखील करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन भावांची कथा आहे जे दिल्लीत राहतात. या सिनेमाचं नाव 'बुलबुल मॅरेज हॉल' असं आहे. (हे पण वाचा : सलमानसोबतच्या या 'मिस्ट्री गर्ल'ला ओळखलं का? )


यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सलमानसोबत कतरिना, सोनाक्षी नव्हे तर एक नवी सुंदरी पाहायला मिळाली. ज्यानंतर 'दबंग खान'सोबतची ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण, असाच प्रश्न अनेकांना पडू लागला. सोशल मीडियावरील चित्रपटांमध्येही ही आहे तरी कोण असंच अनेकजण विचारू लागले. 


हिंदी कलाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असणाऱ्या सलमानसोबत आयफामध्ये येण्याची संधी मिळालेली ही नवोदित अभिनेत्री आहे, सई मांजरेकर. आणि याच सईच्या सिनेमाच्या सेटवरील हा फोटो व्हायरल झाला आहे.