जॅस्मिन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित....
प्रेरणा अरोडा निर्मित जॅस्मीन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
नवी दिल्ली : प्रेरणा अरोडा निर्मित जॅस्मीन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. रिपोर्टनुसार, या चित्रपटात ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात ऐश्वर्या सरोगेट मदरची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
सध्या ऐश्वर्या तिच्या फन्नी खां या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव हे कलाकार आहेत. जॅस्मीन या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा सिद्धार्थ आणि गरिमा यांनी लिहीली आहे.
चित्रपटासाठी ऐश्वर्याकडे साकडे
या चित्रपटासाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले आहे. मात्र तिच्याकडून काही कन्फर्म कळलेले नाही. त्याचबरोबर ऐश्वर्याच्या फन्नी खां या चित्रपटाची निर्मितीही प्रेरणा करत आहे. त्याचबरोबर तिने नरगिस दत्तच्या 'रात और दिन' या चित्रपटाच्या रिमेकसाठी देखील ऐश्वर्याला अप्रोच केले आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी ऐश्वर्याला १० कोटींची ऑफर देण्यात आली आहे.
गुजरातमध्ये होणार शूटिंग
चित्रपटाची कथा ही गुजरात येथील एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे याचे शूटिंग गुजरात आणि राजस्थान येथील पुष्कर येथे केले जाईल. या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते नारायण सिंग यांनी सांगितले की, चित्रपटाची कथा एका महिलेची आहे. जिला स्वतःचे मूल नाहीये. आणि म्हणूनच ती कोणासाठी तरी सरोगेट मदर बनण्याचे पाऊल उचलते. मात्र नंतर लागलेला बाळाचा लळा आणि मग त्याच्यासोबतच राहण्याचा अट्टाहास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.