नवी दिल्ली : सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान सध्या चर्चेचा विषय झालाय. सोशल मीडियामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने तो चर्चेत असतो. त्याचा क्युटनेस सगळ्यांचा भावतो. पण तुम्ही त्याला कधी रडताना पाहिलंय ? तर त्यासाठी तुम्हाला अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण त्याचे रडतानाचे फोटोज समोर आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, ३१ ऑगस्टला दुपारी करिना तैमूरसोबत एयरपोर्टला पोहचली. करिनाने त्याचा उचलून देखील घेतले होते आणि रडणाऱ्या तैमूरला शांत करत होती. पण तो शांतच होत नव्हता. या चिमुकल्याच्या रडण्याचे कारण तिथे उपस्थित असलेल्यांना कळत नव्हते. कदाचित तो फोटोग्राफर्सना बघून घाबरला असेल आणि रडत असेल असा त्यांनी अंदाज बांधला. यापूर्वी देखील तो कॅमेराला सामोरे गेला आहे. परंतु, तेव्हा कधीच तो रडताना दिसला नाही. 



 



करिना तैमूरसोबत दिल्लीला गेली असून लवकरच तिच्या 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटाचं शूटींग सुरु होणार आहे.