मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसच्या बाबतीत फार काटेकोर असते. वयाच्या 48व्या वर्षी देखील मलायका युवा अभिनेत्रींना लाजवेल असा तिचा फिटनेस आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य अनेकींना जाणून घ्यायची इच्छा असेल. मात्र फिटनेस जपण्यासाठी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मलायका काहीही खाणं टाळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाच्या डेली रूटीनमध्ये योगा आणि एक्सरसाईज यांचा समावेश आहे. अनेकदा ती योगा क्लासला जाताना स्पॉट देखील होते. नुकतंच झालेल्या एका इंटरव्यूमध्ये मलायकाने सांगितलं होतं की, दररोज योगा आणि इंटरमिटेंट फास्टिंग तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.



एका वेबसाईटशी बोलताना मलायका म्हणाली होती की, तिचं डेली रूटीन उपवास करण्याप्रमाणेच आहे. शक्यतो ती सकाळच्या वेळेस काही खात नाही. आणि संध्याकाळी दिवसांचा शेवटचा आहार ती 7 ते 7.30 पर्यंत करून घेते. अशा प्रकारे ती 16 ते 18 तास ती काहीही खात नाही. 


सकाळच्या वेळेस मलायका ती लिक्विडच्या सेवनाने सकाळची सुरुवात करते. लिक्विडच्या सेवनाने ती उपवास तोडते. यामध्ये तूप, जिऱ्याचं पाणी, कोमट पाणी, लिंबू पाणी, तसंच नारळ पाणी पिण्यावर भर देते. याचदरम्यान ती अक्रोड किंवा नट्स खाते.



लंच आणि डिनर यामध्ये मलायका संपूर्ण आहार घेते. यामध्ये थोडे कार्ब्स आणि फॅट्स्टचा ही समावेश असतो. यानंतर संध्याकाळच्या वेळेस हेल्दी स्नॅक्स घेते. रात्रीच्या जेवणामध्ये भाजी, डाळ, मांस आणि अंड्आंटा समावेश असतो. 


मलायकाच्या म्हणण्याप्रमाणे, मी प्रयत्न करते की सगळं काही जेवणामध्ये घेऊ शकेन. आणि 7 वाजून गेल्यानंतर मी काहीही खात नाही. बाहेरचं खाणं मी जास्त प्रमाणात खाण्यास पसंत करत नाही.