दीपिकासारखी फिगर हवीय? मग या टीप्स फॉलो करा
दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. दीपिका तिच्या वर्कआउट्सचा आनंद घेते.
मुंबईः दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे.
दीपिका पदुकोण तिच्या वर्कआउट्सचा आनंद घेते, ज्यामध्ये ती निश्चितपणे पिलेट्सचा समावेश करते. सोशल मीडियावर तिचे अनेक वर्कआउट व्हिडिओ आहेत ज्यात ती पिलेट्स करताना दिसत आहे.
आहाराच्या नावाखाली दीपिकाचा स्वतःला उपाशी ठेवण्यावर विश्वास नाही. दीपिकाला जे आवडतं ते सर्वकाही ती खाते. मस्तानी दर दोन तासांनी काहीतरी खात असते. पोट भरण्यासाठी योग्य खा पण अति खाऊ नका असं दीपिकाचं म्हणणं आहे
ट्रेडमिलवर 10 मिनिटे चालणे असो किंवा स्ट्रेचिंग असो, दीपिका सातत्यपूर्ण व्यायाम करते. ती तिच्या वर्कआउटसाठी दररोज एक वेळ निश्चित करते. तिच्या व्यस्त दिवसातून, अभिनेत्री वर्कआउटसाठी वेळ काढायला विसरत नाही.
दीपिका पदुकोण मिठाई खाण्याची शौकीन आहे. जेव्हा तिला गोड खावेसे वाटते तेव्हा ती स्वतःला थांबवत नाही. पण नंतर अभिनेत्री कॅलरी बर्न करण्यासाठी घाम गाळण्यालाही मागेपुढे पाहत नाही. दीपिकाने पटकन कॅलरी बर्न करण्यासाठी तिच्या वर्कआउटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश केला आहे.