मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीची चौकशी दिवसागणिक कठोर होताना दिसत आहे. ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान  2 ऑक्टोबरपासून तुरूंगात आहे. विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी एनसीबीने अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणी अभिनेत्री अनन्या पांडेला देखली समन्स पाठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी याप्रकरणी अनन्याला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अनन्याला सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. पण ती 11 वाजता नाही तर दुपारी 2 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली. तेव्हा अंमली पदार्थ नियामक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे  यांनी चौकशी सुरू करण्यापूर्वी अनन्याला फटकारले.


समीर वानखेडे, अनन्याला म्हणाले, 'तुला 11 वाजता बोलावलं होतं. तू आता येत आहेस. आधिकारी याठिकाणी तुझ्या प्रतीक्षेत नाही बसलेत. हे तुझे प्रॉडक्शन हाऊस नाही. याठिकाणी जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा यावं लागेल...' अशा कठोर शब्दांत वानखेडे यांनी अनन्याला बजावलं. 


दरम्यान, आर्यनच्या अटकेनंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री आनन्या पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सलग दोन दिवस एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. सोमवारी देखील आनन्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. आता अनन्यानंतर आणखी स्टारकिड याप्रकरणी समोर येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.