...अन् दिलजीत दोसांझनं कॉन्सर्टमध्ये करुन दिली आपल्या कुटुंबाची ओळख! आईला अश्रू अनावर; पाहा Video
Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझनं नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये दाखवली कुटुंबाची झलक...
Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा दिल्लीत कॉन्सर्ट होणार आहे. पण त्या आधी तो यूके-टूरवर आहे. तिथे तो परफॉर्म करत आहेत. दिल-लुमिनाटी टूर दरम्यान दिलजीत दोसांझनं त्याच्या कुटुंबातीस सदस्यांना पहिल्यांदाच जगासमोर आणलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत त्याची आई भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबत त्यानं त्याच्या बहिणीची झलक देखील यावेळी दाखवली आहे.
खरंतर, 28 सप्टेंबर रोजी दिलजीत दोसांझचा मॅनचेस्टरमध्ये कॉन्सर्ट होता. तिथे त्यानं एका महिलेला मिठी मारली. इतकंच नाही तर त्यानं हाथ देखील मिळवला. त्यानंतर त्यानं आणखी एका महिलेला वाकून नमस्कार केला आणि तिचा हाथ धरून सगळ्यांना सांगितलं की ही माझी बहीण आहे. जेव्हा त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा मिठी मारली, तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर दिलजीतनं सगळ्यांना सांगितलं की आज माझं कुटुंब देखील आलं आहे. खरंतर, आजवर दिलजीतनं त्याच्या कुटुंबाविषयी कधीच कोणाला काही सांगितलं नव्हतं.
दिलजीत दोसांझनं खूप प्रायव्हेट पर्सन आहे. त्याच्या लग्नाविषयी अनेक बातम्या समोर आल्या. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की एका जवळच्या व्यक्तीनं दावा केला की दिलजीतनं इंडो-अमेरिकन मुलीशी लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. दोघं अमेरिकेत राहतात.
'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत एमी विर्कनं सांगितलं की दिलजीत पाजीच्या नजरेनं पाहिलं तर हा त्यांच्या खासगी आयुष्यातील विषय आहे. हे त्यांचं कुटुंब आहे. काही कारण नक्कीच असेल आणि त्यामुळेच ते त्यांना जगासमोर आणत नाही आहेत. माझी देखील एक पत्नी आणि मुलगी आहे. माझी देखील इच्छा नाही की त्यांनी जगासमोर यावं. त्यांची देखील इच्छा नाही. सध्या ते कुठेही फिरू शकतात आणि कोणाला कळणार देखील नाही की ते माझं एमीचं कुटुंब आहे किंला हे दिलजीतचं कुटुंब आहे. जर लोकांना कळलं तर सगळ्यांची चिंता वाढेल.
हेही वाचा : प्रेमासाठी मोडलं लग्न, पतीसोबत बॉइज हॉस्टेलमध्ये राहिली; पंकज त्रिपाठींची पत्नी म्हणाली, 'त्यांनीच...'
दिलजीतच्या दौऱ्यांविषयी बोलायचे झाले तर यावर्षी 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. त्याच्या तिकिट्सची खूप महाग विकली जात आहेत. लोकं हजारो-लाखो रुपये देऊन त्याच्या कॉन्सर्टचे तिकिट खरेदी करत आहेत. दिल्लीनंतर त्याचा हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, पुणे, कोलकाना, बंगळुरु, इंदुर, चंडीगढ आणि गुवाहाटी असे त्याचे कॉन्सर्ट होणार आहेत.