Sushmita Sen Wedding Lalit Modi : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ललित मोदींनी आपल्या ट्विटरवरुन सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले. त्यामुळे या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. मात्र आम्ही लग्न न केल्याचं स्पष्टीकरण ललीत मोदी यांनी ट्विटद्वारे दिलं आहे. (former ipl chairman lalit modi announces his dating with actor sushmita sen)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये ललित मोदी आणि अभिनेत्री खूप रोमँटिक मूडमध्ये एकत्र दिसत आहेत. विशेष म्हणजे ललित मोदींनी अभिनेत्रीसोबतचे एक दोन नाही, अनेक जुने फोटोही शेअर केलेले आहेत. यावरुन हे दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करतायेत, असं स्पष्ट होतंय.


ललित मोदी यांनी सूचक ट्विट केलंय. सार्डिनियामध्ये एकमेकांच्या सहवासातील फोटो टाकले आहेत. या फोटोला 'बेटर हाफ' म्हणजेच जोडीदार असं ट्विट केलंय. या 'बेटर हाफ' शब्दामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला. मात्र मोदी यांनी आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं.