Sambhaji Raje in Marathi Film : कोणतंही राजघराणं असो त्यांचा वारसा आणि वंशज याबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यातही आपल्या महाराष्ट्रातील राजघराण्याचे सगळ्यांनाच कौतुक आणि आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणजेच संभाजीराजे छत्रपती यांना आपण सगळेच ओळखतो. संभाजीराजे हे नेहमीत गड किल्ल्यांचे संवर्धनावर बोलताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते या लढ्यात सक्रिय आहेत. दरम्यान, आता राजकीय क्षेत्रात कमालीची कामगिरी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे चित्रपटात दिसणार आहेत. आता हे वाचल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की संभाजीराजे छत्रपती कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत? ते कोणती भूमिका साकारणार आहेत? तर याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच ही मुलाखत ‘मुंबई तक’ला दिली होती. या मुलाखतीत त्यांनी राजकीय मुद्यांवर त्यांचं मत मांडल्यानंतर, आता लवकरच मराठी चित्रपट करणार आहेत याविषयी सांगितलं आहे. संभाजीराजे हे लवकरच त्यांच्या मराठी बायोपिकमध्ये त्यांच्या वंशजांपैकी एकाची महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं आहे. 


याविषयी सविस्तर सांगत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की 'काही दिवसांपूर्वी मला नागराज मंजुळेंचा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.' खाशाबा जाधव यांच्याविषयी सांगत संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यावरून नागराज मंजुळे यांनी मला विचारले की तुम्ही ती भूमिका साकारू शकाल का? शहाजी महाराज आणि माझ्या चेहरेपट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. तर मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका करण्याचे स्वीकारले आहे.'


कोण होते खाशाबा जाधव?


खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. तर खाशाबा यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकच्या स्पर्धेतत भारताला कुस्तीमध्ये असलेलं असं पहिलं पदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे कुस्तीत इतकी मोठी कामगिरी केल्यानंतर त्यांचं नाव हे भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं आहे. आता त्यांच्याच आयुष्यावर आधारीत चित्रपट येणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे.