Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. शाहरुख खानचे देशभरात लाखो चाहते आहेत. शाहरुखला भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित केलं आहे. शाहरुख खानच्या नावावर आणखी एक कामगिरी नोंदवण्यात आली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध ग्रेविन म्युझियममध्ये शाहरुखच्या नावाचे सोन्याचे नाणे आहे. ज्यावर त्यांचे चित्र आणि नावही छापलेले आहे. हे नाणे 2018 मध्ये रिलीज झाले होते, परंतु एका चाहत्याने नुकताच या नाण्याचा फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 


अभिनेता शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना असे वाटते की पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममध्ये त्याच्या नावाने सोन्याचे नाणे जारी करण्यात आले आहे. जिथे शाहरुखचा मेणाचा पुतळा देखील आहे. परंतु हे खरे नाही. 2018 मध्येच शाहरुखला हा सन्मान देण्यात आला होता. शाहरुख खानच्या चाहत्याने नाण्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला होता.


पुन्हा एकदा चर्चा



नुकतेच Viral Bhayani ने सोन्याच्या नाण्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.  त्या पोस्टनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्याने 'देशासाठी गर्वाचा क्षण' अशी कमेंट केली आहे. कोणीतरी त्याला जगातील सर्वात मोठा सुपरस्टार म्हणतो तर कोणी असे म्हणत आहे की कोणीही पैसे देऊन त्याच्या नावावर सोन्याचे नाणे बनवू शकतो. या म्युझियममध्ये शाहरुख खानचा मेणाचा पुतळाही बसवण्यात आला आहे.


शाहरुखचा आगामी चित्रपट


अभिनेता शाहरुख खान लवकरच मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पठाण, जवान आणि डंकी हे चित्रपट हिट ठरले. त्यानंतर शाहरुख खान किंग नावाचा पुढचा चित्रपट सुरु करण्याची तयारी करत आहे.