मुंबई : ९०व्या ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणा-या फ्रेन्सिस मॅकडोरमेंड यांचा आनंद तेव्हा हिरावला गेला जेव्हा त्यांना कळलं की, त्यांचा ऑस्कर चोरीला गेला.


ऑस्कर चोरीला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४ मार्चला आयोजित झालेल्या ९०व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात फेन्सिस याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण पुरस्कार सोहळा संपल्यावर त्यांचा ऑस्कर चोरीला गेला. पण आनंदाची बाब ही की, काही वेळातच चोर पकडला गेला आणि फ्रान्सिस यांना त्यांच्या पुरस्कार परत मिळाला.


दुसरा ऑस्कर


एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वॄत्तानुसार, एका ४७ वर्षीय व्यक्तीला ऑस्कर चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केलीये. पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केलाय. अभिनेत्री फ्रेन्सिस यांना मिळालेला हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. याआधी त्यांना १९९७ मध्ये ‘फारगो’ या सिनेमातील भूमिकेसाठी ऑस्कर मिळाला होता. यंदा फ्रेन्सिस यांना ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबबिंग, मिसोरी’ साठी मिळाला आहे.