मुंबई : देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्ण संख्येत तर वाढ होतचं आहे, पण दुसरीकडे रोज हजारो लोकांचे प्राण कोरोना या एक अदृश्य विषाणूमुळे जात आहेत. एखाद्याला कोरोना झाला तर त्याचा प्रवास सुरू होतो. कधी तो प्रवास बेड पासून थेट स्मशानभूमीत थांबतो. कोरोना गरीब श्रीमंत असं काहीही पाहात नाही. आज इतकी कठीण परिस्थिती आहे, की अंतिमसंस्कारसाठी लोकांकडे पैसे तर नाहीचं पण अग्नी देण्यासाठी पण रांग लावावी लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत अभिनेता आणि गरजूंचा देवदूत सोनू सुदने सरकारकडे मृतदेहांवर अंतिमसंस्कार मोफत करण्याची मागणी केली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'काल रात्री जवळपास 3 च्या सुमारास एकाला बेड देण्यासाठी मदत करत होतो. बेड मिळाला पण त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरसाठी स्ट्रगल करावं लागलं. पाच वाजता व्हेंटिलेटर देखील मिळालं. त्यानंतर धडपड करावी लागली अंतिमसंस्कारासाठी. अंतिमसंस्कार देखील झालं, पण या दरम्यान माझ्या एक गोष्ट लक्षात आली.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


सोनू सुद पुढे म्हणाला, 'रूग्णाच्या  लढाईची सुरूवात होते, त्याच्या घरापासून. मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय. घरातून ऑक्सिजनसाठी, त्यानंतर बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर या लढाईत काहींचा वियज होतो, तर काही मात्र शेवच्या टप्प्यावर पोहोचतात. आयुष्याचा शेवटचा टप्पा म्हणजे स्मशानभूमी...'


'आम्ही मदत करत आहोत, पण आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो, की लवकरचं असा कयदा तयार करा, ज्यामुळे अंतिमसंस्कार मोफत होवू शकेल. एका व्यक्तीच्या अंतिमसंस्कारासाठी जवळपास 15 ते 20 हजार रूपये लागतात. देशात रोज हजारो लोकांचं निधन होत आहे.'


'म्हणजे दिवसाला अंतिमसंस्कारासाठी जवळपास 6 ते 7 कोटी रूपयांचा खर्च येतो. जर हा खर्च सरकारने स्वतःच्या खांद्यावर जर का घेतला तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा नातेवाईकांची मदत होईल. त्यामुळे यावर विचार करून निर्णय घ्या..' अशी मागणी सोनू सुदने सरकारकडे केली आहे.