मुंबई : एस.एस.राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिकेत झळकणारा प्रभास काही दिवसांपूर्वीच 'साहो'  या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. साधारण चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्वधींची कमाई केली. शतकांच्या घरात हा आकडा पोहोचणाऱ्या या चित्रपटाला समीक्षकांनी मात्र संमिश्र प्रतिसाद दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पहिल्यापासूनच प्रचंड चर्चा सुरू होती. त्यातच आता आणखी एका विषयाची भर पडली आहे. एकीकडे चित्रपटाविषयी होणाऱ्या नकारात्मक चर्चा आणि दुसरीकडे साहो लीक झाल्याचं ग्रहण यामागोमाग आता हा चित्रपट आपल्या चित्रपटाची नक्कल अर्थात कॉपी करत साकारल्याचा दावा एका दिग्दर्शकाने केला आहे. 


अॅक्शन फिल्मच्या पठडीतील 'साहो' हा आपल्या 'Largo Winch' या चित्रपटाची कॉपी असल्याचा दावा, फ्रेंच दिग्दर्शक Jerome Salle यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती सर्वांसमोर आणली. माझ्या चित्रपटाला दुसऱ्यांगा कॉपी करत पहिल्याच वेळेप्रमाणे तो वाईटपणे साकारण्यात आला आहे. त्यामुळे तेलुगू दिग्दर्शकांनो माझं काम अशा प्रकारे चोरत असाल तर किमान चांगल्या पद्धतीने साकारू शकाल? असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. 




सुजित दिग्दर्शित 'साहो' या चित्रपटाच्या टीमकडून याविषयी कोणतंच उत्तर देण्यात आलेलं नाही. शिवाय चित्रपटाशी संबंधीत कोणाही व्यक्तीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तेव्हा आता हे प्रकरण कोणतं नवं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.