दु:खद | सिनेसृष्टीतील आणखी एक तारा निखळला, चाहत्यांमध्ये शोककळा
नातेवाईकांनी या दिग्गजाच्या निधनाची माहिती मीडियाला दिली आहे.
Jean Luc Godard : फ्रेंच न्यू वेव्हचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते जीन-लूक गोडार्ड (Jean Luc Godard) यांचं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीन-लुक गोडार्ड यांनी 1960 मध्ये त्यांच्या पहिल्याच 'ब्रीदलेस' चित्रपटाने चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली. जीन-ल्यूक गोडार्ड त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वात महत्वाचे दिग्दर्शक म्हणून जगासमोर आले. फ्रेंच मीडियाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा देताना सांगितले की, जीन-लूक गोडार्ड यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. (french iconic filmmaker jean luc godard dies at age of 91)
जीन-लुक गोडार्ड यांनी 1950 च्या दशकात चित्रपट समीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. कॅमेरा, ध्वनी आणि कथेचे नियम त्यांनी स्वत:च्या मर्जीने पुन्हा लिहून घेतले. त्याच्या स्वतःच्या चित्रपटांनी अभिनेता जीन-पॉल बेलमोंडोला स्टारडम दिले.
जीन-लूक गोडार्ड यांचा 3 डिसेंबर 1930 ला पॅरिसमध्ये एका श्रीमंत फ्रेंच-स्विस कुटुंबात जन्म झाला. मात्र जीन स्वित्झर्लंडमधील न्यॉन येथे मोठे झाले. ग्रॅज्युएशननंतर स्वित्झर्लंडमधील धरण प्रकल्पात बांधकाम व्यावसायिक म्हणून नोकरी स्वीकारली. या कामातून मिळालेले पैसे त्यांनी 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऑपरेशन काँक्रीट' या त्यांच्या पहिल्या चित्रपटात गुंतवले.
यानंतर त्यांनी ट्रुफॉटच्या कथेवर आधारित 'ब्रेथलेस' चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. इतकेच नाही तर 1960 मध्ये रिलीज झालेला 'ब्रेथलेस' सिनेमामुळे यश मिळालं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. दरम्यान जीन-लूक गोडार्ड यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरलीय.