मुंबई : दोन मुली किंबहुना बॉलिवूडच्या शिखरावर असलेल्या दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी कधीच बनू शकत नाही, असा दावा वर्षानुवर्ष केला जातोय, पण हाच दावा खोडून काढत आहेत दीपिका आणि आलिया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं पाहिलं तर दीपिका पादूकोण आणि आलिया भट्ट या दोघी एका सिनेमात कधीच दिसल्या नाहीत... पण, बी टाऊनच्या या दोन अभिनेत्री एकमेकांची प्रशंसा करताना थकत नाहीत.


'पद्मावती'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येक जण दीपिकाच्या सुंदरतेची, तिच्या लूकची चर्चा करत होता... आलियाही यात मागे नव्हती... 'मी ट्रेलर पाहिलाय आणि त्यात पद्मावतीच्या रुपातील दीपिकानं खूपच शानदार काम केलंय... ती कमालीची सुंदर दिसतेय... मला माहीत आहे की मी कधीही तिच्याइतकी सुंदर दिसू शकणार नाही किंवा तिच्याप्रमाणे अभिनयही करू शकणार नाही'


दीपिका आणि आलिया 

जशी आलिया दीपिकाची फॅन आहे... तशीच दीपिकाही आलियाची फॅन आहे. दीपिकानं 'लक्स गोल्डन रोज अवॉर्डस'साठी आलियाला एक पत्रही लिहिलं होतं. 'प्रिय आलिया, हायवेमध्ये तू मेकअपशिवाय खुपच सुंदर दिसलीस, परंतु, शूटिंसाठी रोडवर व्यतीत केलेले ते ५२ दिवस कुणालाच दिसले नाहीत. आलिया तू सर्वात लहान आहेस, पण मेहनतीच्या बाबतीत तू सर्वात मोठी ठरतेस... तुझी सर्वात मोठी फॅन, दीपिका!'


दोघींमधला हा संवाद त्यांच्या मैत्रीबद्दल खूप काही सांगून जातोय... होय ना!