मथुरा : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाला आता करणी सेनेनंतर आणखी एका पक्षानं विरोध दर्शवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरु असलेल्या वादाचा पब्लिसिटी स्टंट म्हणून वापर करावा, असं आणखी एका पक्षाला वाटल्यानं त्यांनीही या वादात उडी मारलीय. इतकंच नाही तर भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण ५१ लाख रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचं या संघटनेनं जाहीर केलंय. 


आणखी वाचा : पद्मावत हाऊसफुल , पहिल्या दिवशी किती कमाई?


'ब्रजमंडल क्षत्रिय राजपूत महासभे'च्या पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारीला भन्साळी यांच्या शिरच्छेद करण्याच्या वल्गना केल्यात.


महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष मुकेश सिंह सिकरवार यांनी भन्साळी यांचं मुंडकं छाटणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करत, असं करणाऱ्याला ५१ लाख रुपयांच्या रक्कम चांदीचं ताटात सजवून दिली जाईल, अशी घोषणा केलीय. 


आणखी वाचा : दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड


भन्साळी यांनी इतिहासासोबत छेडछाड करत राजपूतांचा अपमान केलाय. रानी पद्मावतीच्या चरित्राचं हनन केलंय. यासाठी राजपूत समाज या चुकीसाठी चांगलीच अद्दल घडवणार आहे, असं कारण त्यांनी सिनेमाचा विरोध करताना दिलंय.