शाहरुख, रणवीरसहीत `या` पाहुण्यांना अंबानींनी दिलं प्रत्येकी 2 कोटींचं घड्याळ
Ambani`s Gift for Guest at Wedding : शाहरुख खान ते रणवीर सिंग अंबानींच्या लग्न सोहळ्यात पोहोचलेल्या या सेलिब्रिटींना मिळाल्या प्रत्येकी 2 कोटी घड्याळ भेट
Ambani's Gift for Guest at Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट परवा 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकले. मुलाच्या लग्नात हजारो कोटींमध्ये अंबानींनी खर्च केला. या लग्नात फक्त भारतातील नाही तर परदेशातूनही अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाहुण्यांना अंबानींच्या कुटुंबाकडून महागडे गिफ्ट्स देखील मिळाले. त्यांच्यापैकी अनेकांना अनंत अंबानीकडून कोटींची किंमत असलेली घड्याळ भेट म्हणून मिळाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, या लग्न सोहळ्यात अनंत अंबानीचे जे ग्रुम्समेन होते त्या सगळ्या सेलिब्रिटींनी अनंत अंबानीकडून लग्झरी घड्याळ भेट म्हणून मिळाल्या. त्यांना घड्याळ गिफ्ट म्हणून मिळाली होती. त्यात काही बॉलिवूड कलाकार देखील आहेत. त्या कलाकारांमध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंगचं नाव आहे. असं म्हटलं जातं की त्यांना भेट म्हणून मिळालेल्या या घड्याळाची किंमत ही 2-2 कोटी रुपये आहे. त्यांना भेट मिळालेल्या या घड्याळ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनंत अंबानीकडून ग्रुम्समेनला ज्या घड्याळ भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. त्या Audemars Piguet या ब्रॅंडच्या आहेत. घड्याळ 41 एमएसच्या 18 कॅरेट पिंक गोल्ड केसमध्ये आहेत. ज्या फक्त 9.5 एमएम इतक्या मोठ्या आहेत. त्यांच्यात सेफायर क्रिस्टल बॅक आणि स्क्रू लॉक्ड क्राउन देण्यात आले आहेत. घड्याळात Grande Tapisserie पॅटर्नसोबत पिंक गोल्ड डायल देखील देण्यात आलं आहे. त्याशिवाय ब्लू काऊंटर्स, पिंक गोल्ड आवर मार्कर्स, रॉयल ओक हॅन्ड्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Audemars Piguet च्या घड्याळ्यात पिंक गोल्ड टोन्ड इनर बेजेल आणि मॅन्युफॅक्चर कॅलिबर 5134 सेल्फ-वाइंडिंग मुवमेंटसारखे फिचर देण्यात आले आहेत. त्यात एक पर्पेचुपअल कॅलेंडर आहे. जे आठवडा, दिवस, तारिख, एस्ट्रोनॉमिकल मून, महिना, लीप वर्ष, तास आणि मिनिट दाखवतं. घड्याळ्यात 18 कॅरेट पिंक गोल्ड ब्रेसलेट, एपी फोल्डिंग बक्कल आणि एक त्याशिवाय आणखी एक ब्लू एलिगेटर स्ट्रॅप देखील आहे. हे घड्याळ पाण्यात 20 मीटर आत जाऊन काम करु शकतं आणि त्यात 40 तास घड्याळ चालेल यासाठी पावर रिजर्व देखील आहे.
हेही वाचा : अंबानींच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांना पाहताच स्वामी रामभद्राचार्यांनी काय केलं पाहा; Video तुफान Viral
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं लग्न गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. काल त्यांच्या शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम झाला. त्याआधी दोन प्री-वेडिंग कार्यक्रम झाले. अंबानी कुटुंबाच्या या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेत दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली होती. तर त्याशिवाय अनेक बिझनेस मॅन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यात बिल गेट्स यांच्यासह मार्क जुकरबर्ग यांची देखील नावं आहेत.