अंबानींच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांना पाहताच स्वामी रामभद्राचार्यांनी काय केलं पाहा; Video तुफान Viral

Amitabh Bachchan and Swami Rambhadracharya Viral Video : अमिताभ बच्चन आणि स्वामी रामभद्राचार्यां यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 14, 2024, 08:41 AM IST
अंबानींच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांना पाहताच स्वामी रामभद्राचार्यांनी काय केलं पाहा; Video तुफान Viral title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan and Swami Rambhadracharya Viral Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे म्हणजेच अर्थात अनंत अंबानीचा शुक्रवारी 12 जुलै रोजी मुंबईत शाही विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दाक्षिणात्य कलाकार देखील या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. तर अनंत आणि राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी धर्मगुरु देखील पोहोचले होते. 

अनंत आणि राधिकाच्या आशीर्वाद कार्यक्रमात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन देखील सहभागी झाले होते. या सगळ्यात अनंत आणि राधिका यांच्या आशीर्वाद कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अमिताभ बच्चन हे चित्रकूटमध्ये एक धार्मिक आणि सामाजिक सेवा संस्था तुलसी पीठचे संस्थापक आणि प्रमुख स्वामी रामभद्राचार्य यांचे पाय पडून आशीर्वाद घेतल्याचे दिसते. अमिताभ बच्चन जेव्हा त्यांना भेटण्यासाठी पोहोचताच ते त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. ते अमिताभ यांच्याशी काही वेळ बोलले आणि त्यानंतर स्वामी रामभद्राचार्य यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानात काही शब्द कुजबुजले. त्यांच्या संभाषणानंतर अमिताभ बच्चन यांनी आदरपूर्वक त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले.जगद्गुरू रामभद्राचार्य हे एक आध्यात्मिक नेता, विद्वान आणि लेखक आहेत. तर ते जेव्हा 2 वर्षांचे होते तेव्हाचं त्यांची दृष्टी गेली होती. अमिताभ यांच्या या कृत्याची सर्वत्र स्तुती होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'हे थोडं विचित्र...', अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन हे त्यांच्या आधी रेड कार्पेटवर गेलेल्या एमएस धोनीच्या एकदी मागे उभे असतात आणि त्यांची वेळ कधी येईल याची प्रतिक्षा करत असतात. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत निखिल नंदा आणि नात नात नव्या नवेली नंदा दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आधी पापाराझींसाठी पोज देत असलेल्या एमएस धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि लेक जीवा देखील दिसल्या. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.